जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जामोद गावात काहीही कारण नसताना दारूच्या नशेत येवून तरूणावर चाकूने वार करून हाताला दुखापत केल्याची घटना सोमवारी २ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, समाधान भिला पाटील वय-२६, रा. जामोद ता.जि. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तो घरी असताना गावात राहणारा पंकज उत्तम पाटील याने काहीही कारण नसताना दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत समाधान पाटील यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेबाबत मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पंकज उत्तम पाटील रा. जामोद याच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.