दशरथ नगरातून एकाची दुचाकी घरासमोरून लांबविली

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दशरथ नगरातून एकाची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवार २० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजू भागवत पाटील (वय-५२) रा. दशरथ नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ डिसेंबर रोजी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ एएफ ४७९२) त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन करीत आहे.

Protected Content