नाशिक पदवीधरमधून उद्या अर्ज भरणार डॉ. सुधीर तांबे !

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक पदवीधर मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून यातून नाशिक विभागात कॉंग्रेसने आपले विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली असून ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपतर्फे अद्यापही येथून कुणाला उमेदवारी देण्यात आलेली नाही.

कधी काळी भाजपचा बालेकिल्ला असणार्‍या नाशिक पदवीधर मतदारसंघावर डॉ. सुधीर तांबे यांनी तीनदा निवडून येण्याची किमया केली आहे. ते पुन्हा विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले असतांनाच भाजपनेही रणनिती आखून त्यांना अटकाव करण्याची तयारी केली आहे. यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे, धुळ्यातील धनराज विसपुते, तर नाशिकमधून व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या पैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल अशी कधीपासूनच चर्चा सुरू आहे. यातच डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने चर्चेला उधाण आले होते. मात्र आता ते उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content