जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विदयार्थ्यांनी विविध घोषवाक्याव्दारे सजवलेला मतदान करो रथातून जनजागृती उपक्रम राबवण्यात आला असून हा रथ १५ एप्रिलपासून दरोरोज १० गावातील चौकाचौकात व गल्लोगल्ली फिरत आहे. हा रंगीत संगीत रथ जिथे जाईल तिथे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे व स्वखर्चाने व स्वयंप्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारत देशामध्ये लोकसभा निवडणूक ही एक राष्ट्रीय उत्सव म्हणून पाहिले जाते.या राष्ट्रीय उत्सवात शतप्रतिशत मतदारांनी सहभागी व्हावे म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार मतदान जनजागृतीच्या कार्यात ये़थील उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील प्रथम वर्ष एल एल बी च्या विद्यार्थ्यांनी या रथावर एक ध्वनिक्षेपक(स्पीकर) बसवलेला असून खांदेशातील सुप्रसिद्ध कवी मनोहर आंधळे यांनी रचलेले व नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी गायलेले मतदार जागृती गीत सुद्धा गावोगावी ऐकवले जात आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांच्या संकल्पनेतून, व जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने वंचित पाडे व तांडे येथे जनजागृती रथाची यात्रा सुरू आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील १५० पेक्षा अधिक गावांमध्ये ह्या रथाने जनजागृती केली आहे.जाईल तेथे हा मतदान जनजागृती रथ आकर्षण ठरत असून नागरिक उत्सुकतेने कारवरील रंगीबेरंगी स्वरूपात शत प्रतिशत मतदान-देश का सन्मान, ना नशे से,ना नोट से, देश की किस्मत बदलेगी तो वोट से, वोट करो भाई वोट करो, सीमापार दुश्मन पर चोट करो, कामाला लागा-मतदान करा, लग्न टाळा, साखरपुडा टाळा,आळस टाळा,मतदान करा, खुद मतदान करो,औरों से मतदान कराओ, मतदान म्हणजे राष्ट्रसेवा, मतदान म्हणजे समाजसेवा अशा विविध घोषणांचे स्टिकर विविध घोषवाक्य वाचत व ऐकत आहेत. या जनजागृती द्वारे प्रत्येकाने स्वत: मतदान करावे व इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करावे असे वारंवार प्रेरीत केले जात आहे.विधी महाविद्यालयाचे रावसाहेब राऊळ यांच्या नेतृत्वाखाली भरत ससाणे, अक्षय रिठे, आनंद पाटील या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या नयना झोपे(महाजन), अनुजा पाटील, पूजा व्यास, विद्या बोरनारे, ऐश्वर्या आठवले, शैलेष नागला या प्राध्यापकांचे व विनोद धांडे, प्रदीप महाजन या कर्मचार्यांचे मार्गदर्शन; तसेच इतरही काही मित्र मंडळींचे सहकार्य लाभत आहे.