डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात दुसरा ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित

जळगाव प्रतिनिधी ।  येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात सध्याच्या काळात संजीवनी असलेला ऑक्सीजन पुरवठा हा अविरतपणे सुरू आहे. ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी रूग्णालयामार्फत नविन १३ हजार किलोलिटरची क्षमता असलेला नविन प्लान्ट कार्यान्वीत करण्यात आला आहे. एकुण दोन प्लान्टद्वारे २६ हजार ऑक्सीजनची क्षमता आता झाली असून रुग्णांना अविरत ऑक्सीजन पुरवठा केला जात आहे. 

गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना ऑक्सीजनचा अविरत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. उल्हास पाटील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणार्‍या रूग्णांकरीता ऑक्सीजनचा सातत्याने पुरवठा सुरू रहावा यासाठी तब्बल १३ हजार किलोलिटरचा ऑक्सीजन प्लान्ट सुरवातीपासूनच होता त्यात आता नव्याने तितक्याच क्षमतेचा ऑक्सीजन प्लान्ट डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला.

कोरोना लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका – डॉ.वैभव पाटील 

कोरोनाची ही लाट गंभीर स्वरुपाची आहे, त्यामुळे कोविडची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या हॉस्पीटलमध्ये संपर्क साधा, आवश्यक त्या चाचण्या करुन घ्या आणि मनातील  संभ्रम दूर करुन घ्या. आजार लवकर समजला तर उपचाराने रुग्ण लवकर बरा हेातो, मात्र टाळाटाळ केली तर उपचार करणेही कठिण होते. जिल्ह्यात कुठेही ऑक्सीजनची कमतरता असल्यास त्या रुग्णांनी डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात तातडीने यावे यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सदर ऑक्सीजन प्लान्टची माहिती दिली आहे, त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजन लागल्यास डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात शिफ्ट करावे, असेही डी.एम.कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील यांनी सांगितले.

सहा महिन्यापूर्वीच दुसर्‍या प्लान्टचे नियोजन – प्रमोद भिरुड 

गेल्यावर्षीपैक्षा यंदाची कोरोना परिस्थीती गंभीर आहे. वयोवृद्धांनाच नव्हे तर तरुणांना देखील ऑक्सीजनची गरज भासत आहे. डॉ.उल्हास पाटील यांनी दुरदृष्टी ठेवूनच सहा महिन्यापूर्वीच आम्हाला दुसरा १३ किलोलिटरचा ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वित करण्यास सांगितले. डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाचे ४०० बेड अधिग्रहित केले आहे. त्यापैकी ३७० बेड ऑक्सीजन, २५ बेड आयसीयूचे असून सर्वात जास्त ऑक्सीजनची गरज तेथेच असते. कारण व्हेंटीलेटरसाठी ऑक्सीजन आवश्यकत असतो. ३७० पैकी २५० रुग्णांना ऑक्सीजनची गरज लागत आहे. या दोन्ही ऑक्सीजन प्लॉन्टमुळे रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध आहे असे डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांनी सांगितले.

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आता १३ किलोलिटरचे दोन ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वित आहे, दोघांची क्षमता ही २६ किलोलिटर इतका ऑक्सीजन तयार करण्याइतकी आहे. या टँकमधून पाईपलाइनद्वारे रुग्णाच्या बेडपर्यंत ऑक्सीजन पोहोचविला जातो, दरम्यान टँकजवळली पाईपलाईनच्या बाहेर बर्फाचा थर साचतो, तो काढण्यासाठी तसेच टँकच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग येथे कार्यरत असतो, सुलभरित्या रुग्णांना ऑक्सीजन मिळत आहे. रुग्णाची संख्या पाहता १०० ऑक्सीजन बेड वाढविण्याचे नियोजन रुग्णालयाचे आहे. 

Protected Content