डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी कॉलेजतर्फे ३३० कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी

0
134


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष बॉडी कॉम्पोझिशन अ‍ॅनालिसिस शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात तब्बल ३३० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आपली मोफत तपासणी करून घेतली.

उपक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कॅम्पस, जळगाव खुर्द येथे करण्यात आले होते. एकाच वेळी अकाउंट ऑफिस, हॉस्पिटल रिसेप्शन परिसर आणि गोदावरी नर्सिंग कॉलेज येथे हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत चालले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आणि प्रशासकीय विभागाचे राहुल गिरी यांच्या उपस्थितीत पार पडले. तपासणीसाठी आधुनिक ‘कारडा स्कॅन’ या अत्याधुनिक बॉडी कॉम्पोझिशन उपकरणाचा वापर करण्यात आला.

या शिबिरात सहभागी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शरीरसौष्ठवाची सखोल माहिती देण्यात आली. यात प्रमुख घटकांमध्ये स्केलेटल मसल फॅट टक्केवारी, व्हिसेरल फॅट लेव्हल, बॉडी मास इंडेक्स (BMI), आणि बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) यांचा समावेश होता. या तपासणीच्या आधारावर वैयक्तिक सल्ला व निरोगी जीवनशैलीसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आशिष पाटील, डॉ. सचिन आणि डॉ. ऋतुजा यांनी या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. फिजिओथेरपी विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्ग यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली. विशेष म्हणजे, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी स्वतः या शिबिरात तपासणी करून घेत कर्मचाऱ्यांना सहभागासाठी प्रोत्साहित केले.

हा उपक्रम केवळ तपासणीपुरता मर्यादित नसून, त्यामागचा हेतू नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे, तंदुरुस्तीसाठी प्रेरित करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य चळवळीत जनसामान्यांचा सहभाग वाढवणे हा होता. यामुळेच शिबिरात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी या अनुभवाचे विशेष कौतुक केले.