डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात गोदावरी फाऊंडेशनचे संचालक आणि हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, डॉ. माया आर्वीकर आणि प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मार्गदर्शन करताना मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले.

Protected Content