जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लातूर येथील एमआएमएसआर महाविद्यालयात १ व २ सप्टेंबर रोजी फूटबॉल टूर्नामेंटसाठी ट्रायल घेण्यात आल्या होत्या. यात डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडूंनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. यात ते पात्र ठरले असून आता आगामी काळात होणार्या ऑल इंडिया युनिर्व्हसिटीतर्फे आयोजित फूटबॉल टुर्नामेंटसाठी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील विद्यार्थी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पात्र खेळाडूंपैकी शिवम पाटील हा गोदावरी फाऊंडेशनचे वरिष्ठ लेखापाल श्री योगेश पाटील यांचा चिरंजीव आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सप्टेंबर महिन्यात झालेल्या फूटबॉल ट्रायलमध्ये डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडू यशस्वी झाल्याचे पत्र पात्र झाले आहे. यात द्वितीय वर्षातील विद्यार्थी शिवम योगेश पाटील, प्रथम वर्षातील विद्यार्थी चंदन व्ही मोरया या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे खेळाडू आगामी काळात होणार्या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार असून ही महाविद्यालयासाठी गौरवास्पद बाब आहे.
त्याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, क्रीडा संचालक सुरेंद्र गावंडे आदिंनी अभिनंदन केले.