Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक मलेरिया दिनानिमित्त जनजागृती!

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक मलेरिया दिनानिमित्त जनजागृती!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये जागतिक मलेरिया दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘मलेरिया संपेल आपल्यामुळे – एकत्र या, गुंतवणूक करा, नव्याने सुरू करा’ या जागतिक घोषवाक्याला अनुसरून हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन कार्डिओ विभागाच्या डॉ. शुभा शंकर साहू आणि डॉ. रिया अग्रवाल यांच्या सक्रिय पुढाकाराने करण्यात आले. या जनजागृतीपर सेमिनारचा मुख्य उद्देश मलेरिया प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा होता.

कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रय्या अच्चन्ना कांते उपस्थित होते. डॉ. स्वानंद जे.आर. यांनी मलेरिया या आजारावर एक माहितीपूर्ण सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी मलेरियावरील संशोधन, अचूक निदान पद्धती आणि आधुनिक उपचार पद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली.

या महत्त्वपूर्ण सेमिनारमध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि मलेरियासारख्या गंभीर आजाराविषयी उपयुक्त माहिती जाणून घेतली. कार्डिओ-रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागाने हा जनजागृती कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडला. या उपक्रमामुळे मलेरियाविरुद्धच्या लढ्यात जनजागृतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


Protected Content

Play sound