‘या’ आदिवासी गावांसाठी बससेवा सुरू करण्याची डॉ. कुंदन फेगडे यांची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा क्षेत्रातील दुर्गम क्षेत्रातील आदिवासी पाडा वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांसाठी यावल बस सेवा सुरू करण्याची मागणी भाजपाचे पदधिकारी डॉ. कुंदन फेगडे यांनी केली आहे. याबबात त्यांनी बसआगार आगार व्यवस्थापक दिलीप महाजन निवेदन दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली व मोठया प्रमाणावर आदिवासी बांधव वास्तव्यास राहत भागात असलेल्या अंधारमळी, तिडया मोहमांडली गाव असुन येथून न्हावी, सावदा, फैजपुर शहरांमध्ये आदिवासी जिवनाश्यक वस्तुसह शेती, साहीत्य, खरेदी तसेच शैक्षणिक कार्यासाठी विद्यार्थी येणाऱ्या विद्यार्थींनी व विद्यार्थी या शिवाय आरोग्याच्या दृष्टीने तातडीचे उपचार मिळावे. या शिवाय आदिवासी बांधवांकडे लग्नकार्य असल्यास त्यांना खाजगी वाहनधारकांना जास्त पैसे मोजुन प्रवास करावा लागतो. याशिवाय तातडीच्या उपचारासाठी येणाऱ्या महिला व जेष्ठ नागरीकांना या सर्वांना शहरात येण्यासाठी एसटी बस प्रवास हा सर्वांत सुरक्षीत असुन, गरीबांना परवडणारे एसटी बस हे एकमेव साधन आहे. आदिवासी बांधवांनी प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आपल्या समस्या मांडून येण्याजाण्याचे साधन उपलब्ध नसल्याने बससेवा सुरू व्हावी, अशी मागणी मोठ्या संख्येत डॉ. कुंदन फेगडे यांच्याकडे केल्याने त्यांनी तात्काळ यावल एसटी आगाराचे व्यस्थापक दिलीप महाजन यांची भेट घेतली. आदिवासी बांधवांच्या प्रवासा संदर्थातील विविध समस्यांची माहिती देवुन आपल्या यावल आगारातुन न्हावी मार्ग तिडया, मोह मांडली,उसमळी ही बससेवा त्वरीत सुरू करावी मागणी केली आहे.

Protected Content