अमळनेर प्रतिनिधी । येथील मतिमंद मुलांच्या ममता विद्यालयाचे संस्थापक डॉ. कुबेर वैद्य यांचे आज 31 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता दुःखद निधन झाले.
देहदानाचा संकल्प त्यांनी केला असून त्यांचे पार्थिव आज दुपारी 2 वाजता दर्शनासाठी ममता विद्यालय अमळनेर येथे आणले गेले होते. त्यांच्या अंत्ययात्रेला सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
त्यांच्या मागे एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून मंगेश वैद्य यांचे ते वडील होते.
मतिमंद विद्यालयाचे संस्थापक डॉ. कुबेर वैद्य यांचे निधन
6 years ago
No Comments