जळगाव, प्रतिनिधी | शहरात “चला जाऊ परत निसर्गाकडे” ही एकदिवसीय विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळा जळगाव जिल्हा सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीतर्फे रविवारी दि २८ रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेचे लाडवंजारी समाज मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजता पद्मश्री डॉ.सुभाष पाळेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर डॉ. सुभाष पाळेकर हे दिवसभरात उपस्थित जळगावकरांना आणि निसर्गप्रेमींना नैसर्गिक जीवनशैली कशी असावी याबाबत माहिती देणार असून विषमुक्त अन्न छतावर कसे तयार करावे व त्याचे फायदे याबाबत सांगणार आहे. तसेच घराच्या गच्चीवर कशाप्रकारे नैसर्गिक बाग फुलवायची या विषयी डॉ. पाळेकर सांगणार आहेत. राज्यभरातून नागरिक उपस्थिती देणार असून कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क आहे. नागरिकांचे प्रश्नदेखील ऐकून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेला सकाळी ८ वाजता नागरिकांनी उपस्थिती द्यावी,अधिक माहिती साठी डॉ रंजना बोरसे ९८२३२४६२४६ , दीपक सोनार ९३७०५४४३३०१ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.