जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये प्रथम वर्ष बीसीए विद्यार्थिनींसाठी आयोजित फ्रेशर पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत, शिक्षण प्रवासातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या विद्यार्थिनींचे मिठाई आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे व मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मिस फ्रेशर, ग्लास टॉवर, गेस द मूव्ही, सिंगिंग, कॉमेडी, पोetry, सोलो डान्स, ग्रुप डान्स, ड्रामा, एक मिनिट गेम, आणि बलून गेम अशा स्पर्धांनी विद्यार्थिनींचा उत्साह वाढवला.
स्पर्धांमध्ये आदित्या अल्वयान्दी यांना मिस फ्रेशरचा किताब मिळाला, ज्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सादिया शेख, देव्यानी महाजन, आणि शर्फियां चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि नियोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. नीलिमा वारके, प्रा. योगिता घोंगडे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.