डॉ. गिरासे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होण्याबाबत निवेदन

पारोळा प्रतिनिधी । शिंदखेडा तालुक्यातील डॉ. प्रेमसिंग गिरासे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली असून या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी पारोळा तालुका राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

धुळे जिल्ह्यातील दराणे, तालुका शिंदखेडा येथील डॉ. प्रेमसिंग गिरासे हे नवीन मोटारसायकल घेऊन घराकडे निघाले असता हायवेवर अज्ञात व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वर करून त्यांचा खून करून त्यांच्या कडील नवी मोटारसायकल घेऊन क्षणार्धात पसार झाल्याची घटना घडली होती. एका तरुण उमद्या डॉक्टराचा दिवसाढवळ्या अश्याप्रकारे निर्घृणपणे खून झाल्यामुळे दराणे गावासह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे तालुक्यातील सर्व डॉक्टर्स वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या महामार्गावरील झालेल्या खुनाच्या घटनेमुळे चोर, दरोडेखोर यांच्या मनात पोलीस व कायद्याचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

शिंदखेडा पोलिसांनी ३ संशयितांना अटक केली असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, व सदर खटल्याची जबाबदारी सरकारी पक्षातर्फे अँड-उज्वलजी निकम यांच्याकडे सोपविण्यात यावी अशी मागणी पारोळा तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पारोळ्याचे तहसीलदार अनिल गवांदे तसेच पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय संघटक तथा कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील,हिलालसिंग राजपूत, जितेंद्र सिंग राजपूत,डी ए राजपूत, समाधान पाटील, भैय्या बैसाने, लक्ष्मणसिंग राजपूत, विजेंद्रसिंग राजपूत, संदेशसिंग राजपूत, महेंद्रसिगं राजपूत, प्रदिपसिंग राजपूत, योगेश राजपूत,सचिनसिंग राजपूत बोदर्डेकर,धनसिंग राजपूत,प्रविण आप्पा राजपूत, समाधान राजपूत, भोकरबारी सरपंच राहुल राजपूत,विजय लोटन राजपूत,नंदू संतोष राजपूत दहिगाव, डॉ.विजय राजपूत, गोविंदसिंग राजपूत,यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content