रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सामाजिक कार्याची दखल घेत डॉ. प्रविण चौधरी यांना २०२२ चा ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर झाला. नुकताच चोपडा येथे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थित हास्यसम्राट समीर चौगुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन समाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करते. यावेळेस समृध्दी हॉस्पिटलचे डॉ प्रविण चौधरी यांची निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. चैताली चौधरी यांच्यासह पुरस्कार स्वीकारला.
डॉ प्रवीण चौधरी, यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत रकदान शिबीरे, आरोग्य शिबीरे, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम केले. तसेच डॉ प्रवीण चौधरींनी कलेची आवड मनापासून जपत समृद्धी क्रेशनची स्थापना करून युट्यूब चॅनेलवर विनोदी शॉर्ट क्लिप्स, तसेच मोटीवेशनल सॉंग्स निर्मिती केली. यापुढे जाऊन त्यांनी ‘उर्मी’ या एका मराठी चित्रपटाचीदेखील निर्मिती केली आहे. तो लवकरच आपल्या भेटीला येईल याच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रेरणा दर्पण फांऊडेशनचे अध्यक्ष श्याम जाधव, उपाध्यक्ष डॉ. टाटीया, सचिव लतिश जैन आदींनी परिश्रम घेतले.