डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत प्रांजल राय द्वितीय

पाचोरा प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी याकरिता विविध बाह्य स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांचे दालन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते. अशाच प्रकारे येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी प्रांजल रवि राय याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

दरम्यान, विद्यार्थी नेत्रदीपक अशी कामगिरी करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. प्रांजल राय याने उत्तुंग यशाने निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यस्तरावर होणार्‍या या परीक्षेत त्याने लेखी, तोंडी, प्रकल्प, प्रात्यक्षिक अशा सर्वच स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे व प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी त्याचे व त्याला मार्गदर्शन करणार्‍या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

 

Protected Content