जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक २०२०-२१ साठी राज्य कार्यकारिणी पदांसाठी निवडणूक पार पडल्या यात जळगांव इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. स्नेहल फेगडे चेअरमन तर डॉ.अनिल पाटील यांची आयएमए हॉस्पीटल बोर्ड ऑफ इंडिया सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
डॉ.स्नेहल फेगडे सचिव आयएमए जळगाव यांची चेअरमन आयएमए एएमएस पदी तर डॉक्टर अनिल पाटील यांची आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या सचिव पदी तसेच सेंट्रल कौन्सिल वर बिनविरोध निवड झाली. यापूर्वीही जळगाव आयएमएतून डॉक्टर आठवले, डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर विलास भोळे, डॉ. राजेश पाटील, डॉक्टर स्नेहल फेगडे यांनी राज्य कार्यकारिणीवर कार्य केलेले आहे. सलग चौथ्या वर्षी राज्य कार्यकारीणीवर जळगाव आयएमएचे सदस्य निवडून आल्याने राज्यकार्यकारीणीवर निर्वीवाद वचर्स्व सिध्द झाले आहे.
याबाबत बोलतांना डॉ.स्नेहल फेगडे, डॉ. अनिल पाटील यांनी राज्य आयएमएवर सलग तीन वर्ष उकृष्ट काम केल्याने या वर्षी बिनविरोध निवड झाली आहे. हा विजय आमचा दोघांचा नसून जळगाव आयएमएचा असल्याचे सांगीतले.