मोटारसायकलची समोरासमोर धडक : एकाचा जागीच मृत्यु

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सारोळा बु” येथे गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने आपघात झाला आहे. या अपघात एकाच्या डोक्याला मार बसल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यापुर्वीच रस्त्यात त्यांची प्राण ज्योत मालवली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, जगन्नाथ त्र्यंबक हवाळे (वय-७३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सारोळा बु” ता. पाचोरा येथील असून हवाळे हे मोटारसायकलवरून घरी जात असतांना कृष्णापुरी, पाचोरा येथील सुरेश नेरपगार मोटरसायकल एकमेकांवर आदळल्याने नेरपगार हा जखमी झाला तर जगन्नाथ हवाळे यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना,‌ नातवंडे असा परिवार आहे. त्यांचेवर दि. १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Protected Content