डॉ. नि. तु. पाटील यांच्या औषधपत्रकावर आ. महाजन यांची कौतुकाची थाप !

मुंबई प्रतिनिधी । केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलेल्या आवाहनानुसार कृषी कायद्यांबाबतची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून डॉ. नि. तु. पाटील यांनी तयार केलेले औषधपत्रक हे अतिशय उपयुक्त असल्याचे नमूद करत माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी त्यांचे कौतुक केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपच्या वैद्यकीय आघाडी चे दोन दिवसीय निवासी प्रमुख पदाधिकारी राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर हे मुंबई ला रामभाऊ म्हाळगी याठिकाणी सुरू असून त्यात वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक नि. तु. पाटील यांनी तयार केलेल्या औषधपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.नि. तु. पाटील हे वरणगाव येथील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ असून विविध सामाजिक उपक्रमांसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. यातच आता त्यांनी औषधपत्रकाच्या माध्यमातून जनजागृतीचा अनोखा पॅटर्न तयार केला आहे. याच्या अंतर्गत रुग्णांना तपासणी पेपरवर औषधी लिहून दिल्यावर शक्यतो कागदाची दुसरी बाजू ही कोरीच राहते,हे लक्षात ठेवून त्यावर केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर मंत्री यांनी शेतकर्‍यांना दिलेले आश्‍वसन छापून येणार्‍या सर्व रुग्णांना त्याविषयी माहिती दिली जात आहे.

यावेळी डॉ. नि. तु. पाटील यांच्या अभिनव औषधी पत्रकाचे अनावरण माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आ.गिरीश महाजन यांनी केले. यावेळी आमदार संजय केळकर,वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे,डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ.विंकी रुगवानी, डॉ. अनुप मरार,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.बाळासाहेब हरपाळे, डॉ.श्याम पोटदुखे, डॉ. स्वप्नील मंत्री आदी मंडळी उपस्थित होती.

याप्रसंगी आमदार गिरीश महाजन यांनी डॉ. नि.तु. पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. त्याबद्दल जास्तीत जास्त शेतकर्‍यांना आणि शेतकामगारांना माहिती व्हावी,त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा,या साठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी झटून प्रयत्न करावा,असे आवाहन केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले होते आणि त्याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सह संयोजक डॉ. नितु पाटील यांनी त्यांच्या कृती द्वारे दिला आहे,

डॉ नि. तु. पाटील यांनी याआधीही जलसंवर्धन, अवयव दान, एकही फुलराणी जळणार नाही या विषयांवर याच प्रकारे जनजागृती केली आहे, आता शेती विधेयकाबद्दल केलेली कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असून नक्किच इतरांनी त्यांच्या कार्याचे अनुकरण करावे असे आवाहन माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आ.गिरीश महाजन यांनी याप्रसंगी केले.

Protected Content