डॉ. कुंदन फेगडे यांची दिवाळी आदिवासी पाड्यावर !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप नेते तथा समाजसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली आहे.

दरवर्षी यावल-रावेर तालुक्यातील आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे आदिवासी वस्तीवर जावुन सह कुटुंबी दिवाळी साजरी करीत असतात. यंदा देखील त्यांनी विटवा आदिवासी पाड्यावर जावुन फराळ, मिठाई अंगोळी साठी उटन व साबण पणती लहान मुलांना फटाके वितरण केले.

सालाबादा प्रमाणे या वर्षी देखील यावल शहरातील फेगडे कुटुंबीयांनी आदिवासी विटवा पाडा तालुका यावल येथे आदिवासीं परिवार सोबत दिपोत्सव साजरा केला. सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना समाजातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव मात्र आर्थिक परिस्थिति मुळे गोर गरीब कुटुंबं या आनंदा पासून दूर असतात. या आदिवासी घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी.त्यांनाही काही क्षण आनंद मिळावा या उद्देशाने व येणार्‍या पिढीला देखील आपण समाजा प्रती देणं लागतो असे संस्कार घडावे या उद्देशातुन राबवत असल्याचे प्रसंगी डॉ. कुंदन फेगडे यांनी सांगीतले.

आपल्याच सभोवताली अनेक असे गरीब होतकरू लोक असतात की त्यांना एकावेळेचे जेवणासाठी कसरत करावी लागते, त्यामुळे सण साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात. त्यांनाही वाटते की आपणही गोड खावे, नवीन कपडे घालावे मात्र त्यांच्या नशिबी नेहमी अंधार असतो. यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजूना आपण मदतीचा हात द्यावा म्हणुन हा उपक्रम साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन डॉ. कुंदन फेगडे यांनी केले.

यावेळी डॉ. कुंदन फेगडे, शैलेंद्र फेगडे, डॉ. जागृती फेगडे, दिनेश बारेला, सागर लोहार मनोज बारी, दिपक फेगडे सह मोठया संख्येत आदिवासी बांधव आदिची उपस्थिती होती.

Protected Content