Home Cities जळगाव ‘ डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजचा जी.एन.एम. परीक्षेत डंका; ३३ विद्यार्थ्यांना...

‘ डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजचा जी.एन.एम. परीक्षेत डंका; ३३ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ श्रेणी!

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यकीय परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या जुलै २०२५-२६ जी.एन.एम. तृतीय वर्षाच्या परीक्षेत महाविद्यालयाचा ९७.२९ टक्के इतका घवघवीत निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी यशाचा झेंडा फडकवला आहे.

महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यकीय परिषदेने जाहीर केलेल्या या निकालात महाविद्यालयातील तब्बल ३३ विद्यार्थ्यांनी ‘अ+ एक्सलंट’ (A+ Excellent) श्रेणी प्राप्त केली आहे, तर ३ विद्यार्थ्यांनी ‘अ’ (A Very Good) श्रेणी मिळवून विशेष यश संपादन केले आहे. या परीक्षेत सुहानी सुनील लोखंडे हिने तब्बल ८४ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकवला. तिने विशेष प्राविण्यासह हे यश संपादन केले.
यशाची ही मालिका पुढे सुरू ठेवताना सुरेखा सुरेश गावित हिने ८०.८ टक्के गुण मिळवून द्वितीय, मोहिनी रामलाल पाटील हिने ८०.६ टक्के गुणांसह तृतीय, तर तानिश परवीन गोंगालेन हिने ८०.४ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले. याशिवाय तनुश्री मनोहराव पोहाणे हिने ७९.६ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या या चमकदार कामगिरीमुळे डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
आरोग्य व नर्सिंग क्षेत्रात अत्यंत कुशल, संवेदनशील आणि सक्षम मनुष्यबळ घडविण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक विकासावर सतत भर दिला जातो. ‘उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण हाच उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया आहे’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीत आणणारा हा निकाल ठरला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे संस्थात्मक व्यवस्थापन, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Protected Content

Play sound