बास्केट बॉल स्पर्धेत सावदा येथील डॉ. उल्हास पाटील स्कूल विजयी

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव युवा खेल परिषदेतर्फे आयोजित बास्केट बॉल स्पर्धेत गोदावरी फाऊंडेशन संचलित, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथभल विद्यार्थी विजयी झाले. विजयी खेळाडूंची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली असून शाळेसाठी हि अभिमानाची बाब आहे.

 

जळगाव येथील शिवाजी महाराज स्टेडियम येथे स्पर्धा घेण्यात आली. त्यात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा येथील १४ वर्षाखाली व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाला केंद्रीय विद्यालय, वरणगाव येथील विद्यार्थ्यांशी खेळविण्यात आला. यात सावदा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत विजय मिळविला. विजयी विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. त्यात तन्मय सानप, दर्शन सोनार, रितेश सुरवाडे, वेदांत भोगे, शिवम पाटील, लोकेश पाटील, टिना चौधरी यांचा समावेश आहे.

विजयी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री. असलम सर, वसीम शहा, प्रशांत सोनवणे  यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

 

 

अभ्यासाबरोबरच खेळातही प्राविण्य

आमच्या शाळेतील विद्यार्थी हे अभ्यासात नेहमीच पुढे असतात. त्यांचा संपूर्ण विकास व्हावा याकरीता शाळा विविध उपक्रम राबवित असते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा शैक्षणिक स्तरावर पुढे जातोच त्यासोबतच खेळातही आमच्या शाळेचे विद्यार्थी नेहमी अग्रेसर असतात. त्याचे हे उदाहरण असून अभ्यासाबरोबरच खेळातही प्राविण्य ते प्राप्त करतात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचेही मी अभिनंदन करते.

– भारती महाजन, प्राचार्या,

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा.

Protected Content