डॉ. हेडगेवारनगर ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे चंदन पाटील बिनविरोध

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डॉ हेडगेवारनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे चंदन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेडगेवार नगरातील सरपंचपदाची निवड ही बिनविरोध झाली होती. यानंतर उपसरपंचपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने भाजप-शिवसेना प्रणित डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायत विकास पॅनलच्या सरपंच व सर्व सदस्यांनी एकमताने पक्ष श्रेष्ठी कडे चंदन पाटील यांचे नाव उपसरपंच पदा करीता सुचवले होते.

या अनुषंगाने पॅनलच्या वतीने चंदन पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. याप्रसंगी सरपंच सविता धनराज सोनवणे, सदस्य मंगलाताई महाजन,शिलाताई देशमाने,शाम पाटील,संभाजी सोनवणे,स्वातीताई चौधरी, शितलताई पवार,या सर्वांनी बिनविरोध साठी प्रयत्न केले.

या निवडी प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हा उपाध्यक्ष संजयभाऊ महाजन,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,जेष्ठ कार्यकर्ते धनराज सोनवणे,सोशल मीडिया प्रमुख टोनी महाजन,सरचिटणीस ऍड. कन्हैया रायपूरकर,अनिल देशमाने, मंदार चौधरी, महेंद्र पवार आदींची उपस्थिती होती.

Protected Content