डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ॐ सुर्याय नम:

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रमक्लमपिपासोष्णशीतादीनां सहिष्णुता । आरोग्यं चापि परमं व्यायामदुपजायते ॥ यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधय: अष्टौ अङ्गानि। तत्र स्थितो योगी ब्रह्म निर्वाणमृच्छति । थकवा, तहान, उष्णता, थंडी इत्यादी सहन करणे. व्यायाम हा आरोग्याचा अंतिम स्रोत आहे.

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी: आठ अंगे. तेथे उभे राहून योगी ब्रह्म निर्वाण प्राप्त करतो. येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमीत्त सामुहिक योगा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, रजीस्ट्रार राहुल गिरी, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. पाटील यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी डॉक्टर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली. योगाचे प्रात्याक्षिक स्मीता चौधरी आणि माधुरी राणे यांनी सादर केले.

Protected Content