लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवु नका

पाचोरा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |     संपूर्ण राज्यात लहान मुले पळवुन नेणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविली जात आहे. अशा प्रकारचा प्रयत्न कोठेही झालेला नाही. ह्या केवळ अफवा असून नागरिकांनी व शाळकरी विद्यार्थ्यांनी घाबरुन न जाता पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी केले आहे.

 

समजा माध्यमांमध्ये   मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेबाबत जनजागृती व्हावी या अनुषंगाने आज रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी  पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत शहरासह तालुक्यातील विविध जि. प., प्राथमिक, माध्यमिक शाळांचे तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.  या बैठकीत पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांना सतर्कत राहण्याचे आवाहन केले.

पाचोरा शहरातील व परीसरातील नागरीकांना पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित करण्यात येते की, मागील काही दिवसांपासून व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करणारे टोळी किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा फिरत आहे. अशा अफवा मुळे इतर जिल्ह्यात जमावाकडुन बहरूपी, वाटसरु, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडलेले आहेत. त्यातून अशा जमावावर गंभीर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. सध्या पाचोरा शहरात व परीसरात अशा अफवा पसरविल्या जात असून लोकांचे मनात भिती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे.  पोलीस प्रशासनाच्या वतीने पाचोरा शहर व परीसरातील जनतेस आवाहन करण्यात येते की,अफवावर विश्वास ठेवू नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिस ठाण्यात दुरध्वनी क्रमांक ०२५९६ – २४०१३३ किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. बातमीची खात्री केल्या शिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करु नये. सोशल मिडीयातुन आलेल्या मेसेजवर डोळे झाकुन विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणा-या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलीसांचे लक्ष आहे. अफवा पसरविल्यास आपणावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अफवेला बळी पडुन आपल्या हातुन गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी स्वत:हुन कायदा हातात घेऊ नये. कायदा व सुव्यावस्था आबाधीत राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी तमाम नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना केले आहे.

 

Protected Content