आंदोलन करू नका…आम्ही सर्व मराठा समाजासोबत ! – मुख्यमंत्री

शेअर करा !

मुंबई प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या पाठीशी सर्व पक्ष खंबीरपणे उभे असून यामुळे आम्ही सर्व सोबत असल्याने समाजबांधवांनी आंदोलन करू नये असे आवाहन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. ते आज झालेल्या बैठकीनंतर बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर पुढील भूमिका ठरवण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक झाली.  ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सरकार आणि विरोधक हे एकमुखाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका ही एक-दोन दिवसांमध्ये ठरविण्यात येईल. यासाठी आधी न्यायालयात बाजू मांडलेल्या विधीज्ज्ञांनी सेवा घेण्यात येत असल्याचे ही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजबांधवांसोबत आम्ही सर्व जण असून आरक्षण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे समाज बांधवांनी आंदोलन करू नये असे आवाहन देखील उध्दव ठाकरे यांनी याप्रसंगी केले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!