डोंगर कठोरा जि.प. उर्दु शाळेत घाणीचे साम्राज्य !

यावल प्रतिनिधी । तालुक्यातीत डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेतील आवारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले. यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

डोंगर कठोरा तालुका यावल येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेच्या कंपाऊंडच्या परिसरातील संरक्षण भिंत नसल्याने चारही बाजुने मोकळया असलेल्या आवारातील आतील ठीकाणी गावातील काही बेजबाबदार नागरीकांनी मागील सुमारे पाच ते सहा वर्षापासुन गुराढोरांसह शेणखताचे उकिरडे टाकुन ठेवले असून, या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या गंभीर प्रश्नाकडे ग्राम पंचायत प्रशासनासह ग्रामस्तरीय स्वच्छता अभियान समितीने तात्काळ लक्ष द्यावे , डोंगर कठोरा ग्राम पंचायत नवनियुक्त सरपंच व सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदच्या उर्दु शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांच्या आणी शिक्षकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे घाणीचे उकीरडे तात्काळ उचलुन त्या ठीकाणी स्वच्छता प्रस्थापीत करावी जेणे करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या महामारीच्या संकटातुन व इतर आजारातुन सुरक्षीता प्रदान करण्यास मदत होईल, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

Protected Content