दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी

bulthana

बुलढाणा प्रतिनिधी । गेल्या 2 महिन्याचा विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावत जिल्ह्यात सरासरी ५९ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३ पैकी 10 तालुक्यात पावसाने ५० टक्क्यांच्यावर सरासरी ओलांडली असली तरी मराठवाड्या लगतच्या देऊळगाव राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात मात्र अपेक्षित असा पाऊस झालेला नाही आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९३.५ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ५८.९३ अशी आहे. यामध्ये प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यात ८१.२१ टक्के, बुलडाणा तालुक्यात ७६.६८ टक्के, शेगाव तालुक्यात ७२.९५ टक्के पाऊस पडला आहे. जळगाव जामोद तालुक्यात ६९.२८ टक्के पाऊस पडला आहे. एकंदरीत गतवर्षीच्या दुष्काळाच्या सावटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात चांगला पाऊस पडला असला तरी पलढग हा मध्यम प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांमध्ये मात्र अपेक्षीत असा जलसाठा झालेला नाही आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जिल्ह्यात अजून पावसाची गरज आहे. त्यामुळे येथील स्थिती काहीशी चिंताजनक आहे. अन्य जिल्ह्यात पावसाने मात्र कहर केलेले असताना त्या तुलनेत गेल्या 2 दिवसात बुलडाण्यामध्ये पाऊस साधारण झाला आहे.

देऊळगाव राजात कमी पाऊस जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद या 3 तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक हजेरी लावली असली तरी देऊळगाव राजा, लोणार आणि मेहकर या 3 तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. एकट्या मराठवाड्याच्या लगत असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यात तर पावसाळ्यातील 2 महिन्यानंतरही पावसाची सरासरी ही ३४.९१ टक्केच आहे.

Protected Content