पिक फवारणी करतांना दोघांना विषबाधा

spraying poisoning 201808126447

जळगाव प्रतिनिधी । शेतातील कपाशी पिकावर फवारणी करतांना दोन शेतमजूरांना विषबाधा झाल्याची घटना जवखेडी ता. पाचोरा येथे घडली. दोघांना अत्यवस्थ वाटत असल्याने जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, युवराज कोमलसिंग पाटील (वय-58) आणि मनोज संजय पाटील (वय-22) दोन्ही रा. जवखेडी ता.पाचोरा हे दोघे शेतमजूर असून दोघेजण कपाशीवर पिकफवारणीचे काम करत होते. दुपारी पिक फवारणी नंतर थोड्यावेळा मळमळ आणि चक्कर येण्यास सुरूवात झाली. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content