पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. कपाटे, डॉ. ग्रीष्मा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर “डॉक्टर्स डे” निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी तीन वेळेस गायत्री मंत्राचे उच्चारण करून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफ यांच्या दिर्घायू आरोग्यासाठी, उन्नती, प्रगतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मुलांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शाळेतील सर्व विशेष विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून विशेष विद्यार्थ्यांना खेळ साहित्य सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ. स्वप्निल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले.