Home क्राईम रुग्णाकडून विनयभंगाच्या आरोपानंतर डॉक्टरची आत्महत्या

रुग्णाकडून विनयभंगाच्या आरोपानंतर डॉक्टरची आत्महत्या


suside
 

नाशिक (वृत्तसंस्था) महिला रुग्णाने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील डॉक्टर गोविंद गारे यांनी सातमजली इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पित्ताचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टर गोविंद गारे यांच्या स्नेहल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यावर उपचार घेत असताना डॉक्टर गारे यांनी ‘तू खूप आवडतेस’ असे म्हणत विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला होता. त्यानंतर रुग्ण महिलेच्या तक्रारीवरुन सिन्नर पोलिसांनी डॉक्टर गारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासानंतर डॉक्टर गारे यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.


Protected Content

Play sound