खामगावात डॉक्टर दाम्पत्याचे ‘ मिशन ओ टू ‘ (व्हिडिओ)

खामगाव , अमोल  सराफ । सध्याच्या कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व सर्वाना कळून चुकले आहे. मात्र, याबाबतची जनजागृती महत्व ओळखून खामगावचे  होमिओपॅथिक डॉ. कालिदास थानवी यांनी मागील दोन वर्षापासून  ‘ओ टू’  मिशन राबवीत आहे.  आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी डॉ. कालिदास थानवी यांच्याशी केलेली बातचीत…

 

आज नष्ट होत असलेली वनसंपदा वाचविणे गरजेचे आहे. हा केंद्र बिंदु मनात धरुन डॉ. कालिदास  थानवी यांनी मिशन ओ टु अंतर्गत मागील काही वर्षांपासून अविरत त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री थानवी व त्यांच्या परिवारातील सदस्य यांनी सुरु केला. पहाता पहाता या ‘मिशन ओ टु’च्या ऊपक्रमात  शहरातील विविध मान्यवरांचा  सहभाग यात वाढत गेला. या मिशन अंतर्गत शहरातील मुख्यरस्ते, ग्रामिण भागातील रस्ते यावरील हिरवळ त्यांच्या संपुर्ण टिमने लहान असलेल रोपट पाणी देऊन जिवित ठेवलेली आहेत.  या रोपांना गुरा ढोरापासुन संरक्षित केले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी मारोती कारवर दोन हजार लिटरची टाकी ठेऊन पाणी देण्याचे काम करण्यात येते.  यासह रोपांचे वाटप व संगोपन याविषयी डॉ. थानवी दामपत्य मार्गदर्शन पुरवितात.  या सर्व कामासाठी करण थानवी, मोहित बोहरा, जगदिश थानवी संदिप पुरोहित ,अमोल सराफ यांचं सह मित्र परिवार सदस्य हे विशेष लक्ष ठेऊन असतात. खामगाव शहरातील ऊद्योजक  विपीन गांधी हे या ऊपक्रमासाठी विशेष मार्गदर्शन देत  असतात . खामगाव शहरासह तालुक्यात असलेले डॉ. थानवी त्यांच्या  आठवड्याच्या रुग्ण तपासणीतून मिळणाऱ्या  रविवारी विश्रांतीचा वेळ वृक्षसंवर्धना देत  आहेत.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/216336306737076

 

Protected Content