जळगाव, प्रतिनिधी । जागतिक रक्तदान दिनानिमित्त दिव्यांग गणेश पाटील यांनी 44 वेळा रक्तदान केल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रेडक्रॉस संस्थेचे उपाध्यक्ष गनी मेमन, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, संचालक सुभाष सांखला, मानद सचिव डॉ. विनोद बियाणी, एस पी.गणेशकर, मुकुंद गोसावी, संघर्ष दिव्यांग संस्थेचे किशोर नेवे, जितू पाटील, गोविंद देवरे, संताराम एकशिंगे, राजेंद्र वाणी आदी उपस्थित होते.