अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील रहिवासी व सध्या मुंबई येथील डी वाय पाटील डीवाय पाटील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फर्मेटिक्स बेलापूर येथे द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी दिव्या शशिकांत पाटील ही नुकतीच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी ग्रीसला रवाना झाली असून प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.
मुंबई येथील नामांकित विश्वनिकेतन संकुल तसेच विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी नामांकित परदेशी विद्यापीठाशी असलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत सहा ते चार आठवड्याच्या प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देत असते अन आत्तापर्यंत हजारो विद्यार्थावर्गाने याचा लाभ घेतला असून यांस अंडर ग्रॅज्युएट फेलोशिप अर्थात युजी फेलोशिप म्हटले जाते. अमेरिका तसेच युरोपमधील निष्णात , नामांकित व तज्ज्ञ प्राध्यापक निवडक भारतीय विद्यार्थ्यांना प्रकल्प आधारित प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण व अध्यापनाचा कालावधी साधारणतः ४ ते ६ आठवडे असतो. यांदरम्यान विद्यार्थाना परदेशी विद्यापीठातील प्राध्यापक संशोधक तसेच प्रयोगशाळा उपकरणे व अद्ययावत संगणक प्रणाली अन संसाधने हाताळण्याचा अनुभव मिळतो. निवडक विद्यार्थ्यांसोबत एक भारतीय प्राध्यापक मार्गदर्शक तसेच समन्वयक म्हणून सुसंवाद साधण्यासाठी उपलब्ध असतो. यशस्वी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रकल्प पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र प्रदान केले जाते. दिव्या पाटीलला ट्विटर सेंटीमेंट अनॅलिसिस या प्रकल्पवार ग्रीस मधील अथेन्स शहरातील हेलेनिक अमेरिकन विद्यापीठ मधील प्रा. सॉक्राटिस सोफिआनोपौलोस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे. विश्वनिकेतन संकुलाचे उपाध्यक्ष तसेच ज्येष्ठ अभियांत्रिकी शिक्षणतज्ञ डॉ. संदीप इनामदार आणि त्यांचे सहकारी हा प्रोग्राम गेल्या कित्येक वर्षांपासून राबवत असून यावर्षी फ्रांस इटली डेन्मार्क बल्गेरिया ग्रीस इंग्लंड आदी ठिकाणी प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत सुमारे १००० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून ते विविध क्षेत्रात महत्वाच्या पदांवर कार्यरत असून चमकदार कामगिरी करत आहेत.
दिव्या पाटील अमळनेर येथील सेवानिवृत्त शिक्षक एस बी पाटील यांची नात व प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची सुकन्या व दिव्यमराठीचे पत्रकार डॉ, चंद्रकांत पाटील यांची पुतणी आहे. तिच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.