धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी विनय पाटील व भावेश पवार यांनी लांब उडी स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर मजल मारली आहे.
जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धांमध्ये गुड शेपर्ड स्कुल येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थी विनय शांतीलाल पाटील या खेळाडूने अंडर १७ गटात तर इयत्ता आठवीत विद्यार्थी भावेश शंकर पवार याने अंडर १४ गटात लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक संपादन करून विभागीय स्तरावर झेप घेतली. या यशस्वी कामगिरीबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि सर्व शाळेच्या वतीने पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, सुनिता भालेराव, लक्ष्मण पाटील हे शिक्षकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन नाजनिन शेख यांनी केले.