भुसावळ प्रतिनिधी । बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक रचनेवर महाराष्ट्रभर एक संघटनात्मक आढावा आणि संवाद बैठक दौरा सुरु असून आज जळगावातील हॉटेल देव हाईट रेल्वे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली.
वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने राज्याचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष प्रा.गोविंद दळवी, प्रदेश महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ ,राज्य महिला उपाध्यक्ष साविता मुंडे, राज्य विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ. मनोज निकाळजे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रभर संघटन समीक्षा व संवाद बैठीकीसाठी दौरा करण्यात येत आहे.
सदर बैठकीचे नियोजन प्रमोद इंगळे जिल्हाध्यक्ष जळगांव पश्चिम, विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष जळगांव पुर्व यांनी केले. सदर आढावा बैठकीचे प्रास्ताविकेत विनोद सोनवणे यांनी जिल्ह्यातील आढावा सादर केला. राज्य विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ. मनोज निकाळजे तसेच महिला व युवक राज्य सदस्य शामिभा पाटील, महिला आघाडीच्या राज्य महासचिव अरुंधती शिरसाट, राज्य उपाध्यक्ष प्रा.गोविंद दळवी व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूरयांनी कार्यकत्यांना आगामी काळात येणाऱ्या जि.प नगरपालिका निवडणूक व सामाजिक तसेच राजकीय विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा ,विचारधारा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे तसेच संघटनात्मक बांधणी करण्याचे आवाहन केले.
सदरच्या बैठकीस प्रमोद इंगळे जिल्हाध्यक्ष जळगांव पश्चिम, दिनेश इखारे जिल्हा महासचिव,नरेश पाटील जिल्हा महासचिव, महेंद्र सुरडकर जिल्हा उपाध्यक्ष, रफिक बेग जिल्हा उपाध्यक्ष, मोहम्मद शफी जिल्हा उपाध्यक्ष, राजेंद्र बारी जिल्हा संघटक, अरुण नरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष, अॅड. विनोद इंगळे जिल्हा प्रवक्ता, वैभव शिरतुरे जिल्हा कार्यालयिन सचिव, महानगर प्रमुख दिपक राठोड, नितीन रणित जिल्हा उपाध्यक्ष, सलिम शेख जिल्हा संघटक सचिव, दिपक मेघे जिल्हा सचिव, सचिन बाऱ्हे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, उपाध्यक्ष मनोज अडकमोल, डिगंबर सोनवणे, बालाजी पठाडे चिटणीस कामगार आघाडी, धोंडु वाघ जिल्हा सल्लागार, सचिन वानखेडे जिल्हा संघटक सचिव, सुपडा निकम बोदवड तालुकाध्यक्ष, बाळु शिरतुरे रावेर तालुकाध्यक्ष, संतोष कोळी भुसावळ तालुकाध्यक्ष,सुनिल पाटिल,सचिन सुरवाडे जामनेर तालुकाध्यक्ष,जितेंद्र केदार, गणेश इंगळे तालुका सचिव भुसावळ, गणेश जाधव भुसावळ शहराध्यक्ष, देवदत्त मकासरे भुसावळ शहर महासचिव सह जिल्हातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच दुपार सत्रात प्रदेश कार्यकारिणीने संपूर्ण १५ तालुका कार्यकारीणीच्या पदाधिकारी यांच्याजवळ संवाद साधून पक्षाचे काम करीत असतांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. तसेच पक्षीय कामकाजाचा वेग वाढवून गाव तेथे शाखा, जिल्हा परिषद सर्कल, बूथ बांधणी यावर भर देण्याचे आदेश दिले तसेच संपूर्ण तालुकाध्यक्ष यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन त्यांच्या कामाची तपासणी व पडताळणी केली व पक्ष वाढीसाठी योग्य त्या सूचना दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ.नारायण अटकोरे यांनी केले तर जळगाव पश्चिम जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी आभार मानले.