जिल्हा वकील संघ निवडणूक : उद्या मतदान

WhatsApp Image 2020 01 13 at 3.12.59 PM

जळगाव,प्रतिनिधी | येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी उद्या  दि. २० जानेवारीला सकाळी ८ ते ४ यावेळेत बार लायब्ररीत मतदान घेतले जाणार आहे. यापूर्वी कार्यकारिणी सदस्य म्हणून १० सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे.

वकील संघाच्या निवडणूकीमध्ये अध्यक्षपदासाठी अॅड. दीपकराज खडके, अॅड. किशोर भारंबे, अॅड.दिलीप बोरसे तसेच उपाध्यक्ष पदांसाठी अॅड.प्रभाकर पाटील, अॅड. सुभाष तायडे हे रिंगणात आहेत. तर सचिव पदासाठी अॅड. नत्थू पाटील, अॅड. दर्शन देशमुख, सह सचिव पदांसाठी अॅड. चेतना कलाल, अॅड. स्मिता झालटे, अॅड. मंजुळा मुंदडा, अॅड. प्रतिभा पाटील, कोषाध्यक्ष पदांसाठी अॅड. संजय रुणवाल, अॅड. शरद न्हायदे हेदेखील रिंगणात असून वरील उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतपेटीत बंद होणार आहे. मतदान हे वकील संघाचे ग्रंथालयात घेण्यात येईल. यावेळी निवडणूकीसाठी सहाय्यक म्हणून अॅड.जयंत कुरकुरे, अॅड. श्रीकृष्ण निकम, अॅड. विरेन्द्र पाटील, अॅड. अरविन्द शुक्ला, अॅड. अमोल बारी, अॅड. संदीप पाटील, अॅड. चंद्रशेखर निकुंभ यांची नेमणुक करण्यात आली आहे. ते उदया निवडणुकीचे कामी सहाय्य करतील. संध्याकाळी ४.३० वाजेनंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर होईल , अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. आर. एन. पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड. ए. आर. सरोदे, अॅड. शिरीन अमरेलीवाला यांनी दिली.

Protected Content