फैजपूर, प्रतिनिधी | प्रधानमंत्री शेतकरी मानधन अभियान तसेच जलशक्ती अभियान राबवण्यासाठी योजना गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली.
या भेटीप्रसंगी परिषद सिईओ बी. एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, अनिल भोकरे उपसंचालक कृषी विभाग बोराडे, उपविभागीय कृषी अधिकारी यावल तालुका कृषी अधिकारी रियल तळेले, रावसाहेब पाटील, कृषी सहाय्यक नावे जेडी बंगाळे मंडळाधिकारी फैजपुर प्रकाश चौधरी, कृषी सहाय्यक मारूळ शरद महाजन, सरपंच भारती नितीन चौधरी, उपसरपंच सतीश जंगले तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य नाही गावातील ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या शेतकरी पेन्शन योजना ही १८ ते ४० वयोगटातल्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ५५ ते २०० रुपये मासिक हप्ता साठे साठ वर्षापर्यंत भरून सात लाख ३६ हजार रुपये मिळणार. देशात रावेर, यावल तालुक्यातील पाण्याची पातळी दरवर्षी तीन मीटरने म्हणजे सर्वात जास्त खाली जात असल्याचे चित्र आहे. पाण्याचे नियोजन आताच करावे लागेल. पाण्याचं पुनर्भरण व्यवस्था केली पाहिजे. सर्वांनी गाव स्वच्छ ठेवायला पाहिजे. पाणी शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत पुनर्भरणासाठी वापरावे. आज गावांमध्ये लोकसहभागातून स्वखर्चाने नदीपात्रात बंधारे बांधल्याने पाणी झिरपत आहे. मोर धरणातून बाहेर पडणारे पाणी ७५ टक्के पाठ साऱ्या व २५ टक्के मोरणा ते सोडावे तसेच सुखी धरणाचे पाणी २५ टक्के पाटचाऱ्यांना सोडावे याचा फायदा नावे बोरखेडा आमोदा मारूळ येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल याची व्यवस्था करावी असे निवेदन नावे, बोरखेडा, आमोदा, मारून ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी ढाकणे यांना दिले . तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे कार्ड वाटप लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी यांनी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.