Home Cities जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली : रोहन घुगे नवे जिल्हाधिकारी !

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली : रोहन घुगे नवे जिल्हाधिकारी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून याबाबतचे आदेश आज निर्गमीत करण्यात आले आहेत.

आज राज्य सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रोहन घुगे हे जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.

रोहन घुगे हे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता ते जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound