ग्राम रोजगार सेवकांना टँब वाटप

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नियोजन विभाग, मंत्रालय) अंतर्गत अमळनेर तालुक्यात सर्व ११९ ग्राम रोजगार सेवकांना म.सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल जी भदाणे, नरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किशोर ठाकरे, राजेश टाक, नरेगा तांत्रिक अधिकारी किशोर पाटील यांचे हस्ते ग्राम स्तरावर ऑनलाईन मनरेगा कामकाजासाठी टॅबलेट मोबाईल वाटप करण्यात आले. रोजगार सेवकांना रोजगार हमी योजनेसाठी ऑनलाइन कामासठी शासनातर्फे मोबाइल टॅब वाटप त्यानुसार अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील रोजगार सेवकांना मोबाइल टॅब देण्यात तसेच सर्व रोजगार सेवकांना तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमीचे काम सुरू आहे. रोज ग्रामरोजगार सेवकांना जियो टॅगिंग केलेल्या ठिकाणी मजुरांना बोलावून ऑनलाइन हजेरी घ्यावी लागते. हजेरी घेतल्यानंतर फोटो अपलोड करून सेव्ह करून पुन्हा दुपारच्या सत्रात ऑनलाइन हजेरी घ्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया रोजगार सेवकांना त्यांच्या मोबाइलवर करावी लागणार आहे.पण आता शासन ग्रामरोजगार सेवकांना मोबाइल टँब मध्ये सर्व रोजगार हमी योजनेचे अंतर्गत ऑनलाईन कामे करता येणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल व रोजगार हमी योजनेतून विहिरींची काम सुरू आहे. या कामावर काम करणाऱ्या मजूरांची नोंदणी करण्यासाठी मोबाइल टॅब फायदेशीर ठरनार आहे .

Protected Content