सावद्यात तृतीयपंथ्यांना मतदान व आधारकार्डचे वाटप

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त सावदा येथील तृतीयपंथीयांना प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याहस्ते मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि आधार कार्डचे वाटप करण्यात आले.

 

जगभरात ३१ मार्च रोजी जागतिक तृतीयपंथी ओळख दिन साजरा केला जात आहे. या अनुषंगाने सावदा येथील तृतीयपंथी यांना अनेक वर्षांपासून मतदान कार्ड, रेशनकार्ड आणि आधार कार्ड नसल्याने त्यांना धान्यापासून वंचीत रहावे लागत होते. त्यांचीही गरजा पाहता पत्रकार व फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी समस्या जाणून घेत. तृतीयपंथी यांच्याकडून कागदपत्राची पुर्तता करून आज ३१ मार्च रोजी जागतिक तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्त्ताने मतदान कार्ड, रेशन कार्ड आधार कार्डचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम शहरातील ताप्ती सातपुडा जर्नलिष्ट फाऊंडशेन आणि महसूल अधिकारी यांच्यावतीने घेण्यात आला.

यावेळी तृतीयपंथी शिला गुरू आरती, गौरी गुरू आरती, निकिता गुरू गौरी, आलिया गुरू गौरी उपस्थित होत्या. तर आरती नायक गुरू साफिया, सायरा गुरू आरती या बाहेगावी उत्सव निमित्त बाहेर गावी होत्या. यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रवीण  वानखेडे, तलाठी शरद पाटील, विक्रम राठोड, ताप्ती सातपुडा जर्नलिष्ठ फाऊंडेशनचे अध्यक्ष शाम पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, पंकज पाटील, कमलाकर पाटील, भारत हिवरे, कमलाकर माळी, साजिद शेख, मिलींद टोके, फरीद शेख, युसूफ शाह, दिलीप चांदेलकर, पिंटू कुलकर्णी, पिंटू तडवी, सुरेश बोरनारे, तडवीसह नागरिक उपस्थित होते.

Protected Content