यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजोबांनी नांतवाच्या वाढदिवसानिमित्ताने होणारे ईतरत्र खर्च टाळून सामाजिक बांधिलकी म्हणुन गरजु विद्यार्थ्यांना मदत करत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावल तालुक्यातील बोराळे गावातीलच धम्म बांधव भिमराव सुका वानखेडे यांच्या वतीने सुरुवात, वैशाख बौद्ध पौर्णिमा पासून सुरू करण्यात आलेल्या बौद्ध पूजा पाठ (सकाळी ७ वा) तसेच संध्याकाळी रोज (५ ते ६ वाजता पर्यंत) क्लास मध्ये बोराळे गावातील धम्म बंधू भिमराव सुका वानखेडे यांच्या वतीने त्यांचा नातु जिग्नेश वानखेडे जो स्वतः क्लास मध्ये आहे. त्याच्या हस्ते,गरिब गरजु व होतकरू अशा ३५ विद्यार्थीं व विद्यार्थीनींना शालेय साहित्य म्हणुज १०० पेज वही ,एक पेन, एक खोड रबर, एक पेन्सिल, एक शॉपनर आणि एक मराठी उजळणी प्रत्येकी (६-वस्तूंचे) संच साहित्य वाटप करण्यात आलेत.
१५ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता चुंचाळे/बोराळे (बौद्ध वाड्यातील) तसेच गावातील ज्या व्यक्तींना उपस्थित राहता येईल, त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन/विनंती,तसेच किनगांव येथील बंधू संभाजी भाऊ पालवे यांच्या वतीने देण्यात आलेल्या १५ मराठी उजळण्या देण्यात आल्यात. या कार्यक्रमास भिमराव सुका वानखेडे, विक्की वानखेडे, विवेकांनंद मुरलीधर तायडे ,शंकर सावळे ,राजु सोनवणे ,शिवाजी गजरे , अमर वानखेडे ,राजु सोनवणे आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुपडू संदांशिव यांनी मानले.