पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथील आर.बी.आर. कन्या शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला राघो पाटील या होत्या. प्रमुख अतिथी प्रदीप लोढा व दलितमित्र मोरसिंग नाईक होते.
या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर ९ वी व १० वीच्या विदयार्थीनींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ईश्वर पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक सुधीर महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.