जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकर्यांना नफा ना तोटा या तत्त्वावर बॅटरीवर चालणारे फवारणी पंप व डाले याचा वाटप जामनेर शहराच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जे. के. चव्हाण, मार्केट कमिटी सभापती राजमल भागवत उपसभापती वसुदेव घोंगडे, शेतकरी संघ संचालक तुकाराम निकम, तुकडोदास नाईक यांच्यासह शेतकरी संघ संचालक शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.