महापौर व उपमहापौर यांच्याहस्ते मास्क, सॅनिटायझरचे वाटप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जागतिक आरोग्य दिनानिमित्त शास्त्री टॉवर चौक आणि कोर्ट चौकात महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्याहस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.  ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग शहरात जास्त प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील टॉवर चौक आणि कोर्ट चौकात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना  मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 

यावेळी महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, विनामास्क फिरणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अश्या नागरीकांवर कारवाई केली पाहिजे. आजच्या परिस्थिती नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. काल उपायुक्तांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याचा प्रकार निषेधार्थ आहे. त्यामुळे आज आरोग्य दिनाचे औचित्य साधुन रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधुन जनजागृती केली जात आहे.  

तर उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी सांगितले, कोरोना महामारीत आपण आपल्यासह आपल्या कुटुंबियांची जाबाबदारी घेणे आवश्यक आहे. नागरीकांना जिल्हा प्रशासनाना सहकार्य करून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, जेणे करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. यावेळी नगरसवेक नवनाथ दारकुंडे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

https://www.facebook.com/508992935887325/videos/2271887696277970

 

Protected Content