जळगाव, सचिन गोसावी । येथील रेल्वे स्थानकावर असलेल्या कुली बांधवांना ओम साई रियल इस्टेटचे रमेशकुमार मुनोत व युवा शक्ती फाउंडेशन यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने किरणा कीटचे वाटप करण्यात आले.
कुली बांधवांचे लॉकडाऊनमुळे मोठे हाल होत आहे. रेल्वेचे प्रवासी घटल्याने त्यांच्या रोजच्या खाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या कुली बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन जळगावातील व्यावसायिक ओम साई रियल इस्टेटचे रमेशकुमार मुनोत व युवा शक्ती फाउंडेशन विराज कावडीया यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानकजवळ कुली बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले. यावेळी आगमी अक्षयतृतीया व ईद सारखे सणाच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या मदतीने कुली बांधवांनी आभार मानले. दरम्यान, याप्रसंगी युवा शक्ती फाउंडेशनचे विराज कावडीया यांनी या सामाजिक उपक्रमाबाबत माहिती देतांना सांगितले की, कोरोना काळात रेल्वेचे प्रवाशी घटल्याने येथील कुली बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच अक्षयतृतीया व ईद सारखे सण येत असून हे कशा प्रकारे गोड करता येथील याबाबत ओम साई रियल इस्टेटचे रमेशकुमार मुनोत यांच्याशी चर्चा करून किरण कीट वाटपाचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2218533148283348