खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या उन्हाचा तडाका सर्वत्र जाणवत आहे .आणि त्यातील जिल्ह्यातले सर्वात उष्ण शहर म्हणून खामगाव ची ओळख जवळपास उन्हाचा पारा हा 44 डिग्री च्या गेलेला आहे. अंगाची लाहीलाही होत असताना नागरिक त्रस्त आहे व थंड शीतपेय, पाणी, उसाचा रस या शीतपेहाकडे ते आपली तहान भागत आहे. यातच एक स्तुत्य उपक्रम राबविला गेला आहे. खामगाव शहरातील नेहमी समाजसेवा मध्ये अग्रेसर असलेलं विजयलक्ष्मी ग्रुप व कर्मचारी कामगार व देशमुख परिवार यांचं वतीने व परम पूज्य भय्यूजी महाराज यांच्या हयातीत सुरू झालेलेल्या उपक्रमांतर्गत. विजयालक्ष्मी पेट्रोलियम येथे कै. तेजराव रंगराव देशमुख व प्रमिलालताई तेजराव यांच्या स्मृतिपित्तर्थ आज 7 मे 2024 रोजी विजयालक्ष्मी पेट्रोल पंप वर येणाऱ्या सर्व ग्राहकांना आज दिवसभर मोफत उसाच्या रसाचे वाटप केल्या जात आहे.
व्यवसाय सोबत नेहमी सामाजिक बांधिलकी जपत विजयालक्ष्मी पेट्रोल पंप ग्रुप व देशमुख परिवाराने वेळोवेळी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असते त्यातच त्यांच्या सर्व ग्रुप कामगार कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत हा स्तुत्य असा सर्व ग्राहकांकरता मोफत उसाच्या रसाचे वाटप. आज दिवसभर विजयालक्ष्मी पेट्रोलियमच्या ग्राहकांकरता ठेवला आहे. मुख्य म्हणजे कर्मचाऱ्यांनी त्यांचे वडीलधारी आधारवड कै. तेजराव रंगराव देशमुख यांच्या स्मृतिपित्तर्थ स्वतः पुढाकार घेत हा उपक्रम मागील आठ वर्षापासून राबवत आहे. हे विशेष हे प्रकारे आपल्या वडीलधाऱ्या आधारवडाला कृतीतून आदरांजली या कर्मचाऱ्यांनी दिली आहे असे म्हटलं तर वावग ठरणार नाही. या उपक्रमाकरिता विजयालक्ष्मी ग्रुप चे सर्व कामगार कर्मचारी विजयालक्ष्मी ग्रुपचे संचालक नरेंद्र देशमुख, अजिंक्य देशमुख व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. सदर उपक्रमानंतर सर्व विजयालक्ष्मी ग्रुपच्या कामगार कर्मचाऱ्यांना देशमुख परिवार च्या वतीने भेटवस्तू देखील देण्यात येतात.
विजय लक्ष्मी ग्रुप कर्मचारी कामगार व देशमुख परिवारच्या वतीने आज मोफत उसाच्या रसाचे वाटप
8 months ago
No Comments