यावल, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जयंती निमित्त शिवभोजन केंद्रामध्ये गरजूंना भोजन व मिठाई वाटप करण्यात येऊन शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावल शिवसेनेचे शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळेस गरजू व गरीब लोकांना मोफत जेवण व मिष्ठांन्न म्हणून जिलेबी देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, रिपाईचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू पारधे, हाजी फारुख शेख, भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस परेश नाईक, सागर कांबळे यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.