यावल महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महारांजाची जयंती उत्साहात साजरी

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित जळगाव संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्षामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सुभाष कामडी उपस्थित होते व अध्यक्षस्थान उपप्राचार्य ए.पी. पाटील यांनी भूषविले. प्रा.ए.पी.पाटील यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.आर.गायकवाड यांनी केले.

सुभाष कामडी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल विचार व्यक्त केले. प्रा.ए.पी.पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणविशेष सांगून आवाहन केले की “प्रत्येकाने शिवाजी राजांपासून आदर्श घ्यावा व समाजकंटकापासून दूर राहावे.” प्राचार्य डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस पी.कापडे यांनी केले तर आभार प्रा.मनोज पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार, प्रा. संजय पाटील , प्रा .मुकेश येवले, मिलिंद बोरघडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content