जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील थेपडे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गरीब होतरून विद्यार्थ्यांना अपेक्षित संच मोफत वाटप करण्यात आले आहे.
तालुक्यातील म्हसावद येथील स्व. थेपडे उच्च माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन डॉ के.पी.थेपडे व प्राचार्य पी.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद, बोरनार, दहिगाव, डोकलखेडे, माहिजी, कुरंगी येथील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या घरी शाळेतील शिक्षकांनी भेट घेतली. तसेच परिक्षांसंदर्भाच चर्चा व मार्गदर्शन केले. कोरोनाची काळजी घ्यावी असे सांगण्यात आले. दरम्यान १२वीत असलेल्या गरीब होकररून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अपेक्षित प्रश्नसंच मोफत देण्यात आले. याबद्दल पालकांनी विशेष आभार मानले. परीक्षेसंदर्भात कोणत्याही अफवांना बळी न पडता कॉलेजकडून वेळोवेळी मिळत असलेल्या सूचनांकडे लक्ष देण्यात यावे, परीक्षेची भिती न बाळगता सामोरे जावे, अशा सूचना शिक्षकांकडून देण्यात आल्या.
शिक्षक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला त्यांच्या घरी येवून दखल घेतल्याने सदर उपक्रमाला पालकांकडून स्वागत करण्यात आले व शिक्षकांचे विशेष आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद शिक्षकांना भेटी दरम्यान दिसून आला.